गरीब,भटक्या कुटुंबाना शिधा किट पुरवठा व संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य हेल्पलाईन

गरीब,भटक्या कुटुंबाना शिधा किट पुरवठा व संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य हेल्पलाईन

कोरोना मुळे लॉकडाऊन स्थितीत अनेकांचे रोजगार बुडाले. यात्रा जत्रा यांच्यासाठी फिरणारे फिरते विक्रेते, खेळणीवाले, उंटवाले, देवगाडी वाले, डवरी, बहुरूपी, वाजंत्री इत्यादी भटक्या लोकांचे अन्नावाचून आबाळ होणार नाही याची काळजी सेवाभारती ने केली. भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते तानाजी रावळ व श्रीकांत गागडे व रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या आधारे हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यातील ४६५ भटक्या कुटुंबासह सुमारे २३०० गरजू कुटुंबाना शिधा किट देऊन तातडीचा आधार सेवाभारतीने दिला.

संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य हेल्पलाईन

रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांच्या आधारे सेवाभारतीने जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्याच्या प्रमुख केंद्रातील ६८ डॉक्टर्सचा सहभाग असलेली “फाईट कोरोना” ही वैद्यकिय हेल्पलाईन तात्काळ कार्यान्वित केली. या सर्व डॉक्टर्सना सुरक्षेसाठी PPE किट सेवाभारती पुरवत आहे. कोरोना साथ सुरू झाल्यानंतर २४ तास चालणाऱ्या बाह्यरुग्ण विभागात ५ डॉक्टर्स कडून कोरोना स्क्रिनिंग साठी फिव्हर क्लिनिक सुरू केले. लॉकडाऊन मुळे सामान्य माणसाचा बुडालेला रोजगार लक्षात घेऊन संचालक मंडळाने बाह्यरुग्ण विभागाचे शुल्कात पुढील ३ महिन्यांसाठी ५0% सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अनेक रुग्णांच्या मनातील कोरोनाची भीती दूर केली. त्यासाठी सायकोथेरेपिस्ट श्री अजिंक्य गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील समुपदेशकांची हेल्पलाईन कार्यान्वित केली. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या सुविधेचा आधार मिळाला.कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या शाहूवाडी तालुक्यात तहसीलदारांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागासोबत डॉ हेडगेवार फिरते रुग्णालयाच्या माध्यमातून दुर्गम गावांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम सेवाभारतीचे डॉक्टर व कार्यकर्ते करीत आहेत. आज पर्यंत सुमारे ६५ गावातील ७५०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.