सामाजिक रक्षाबंधन २०२३

  • Post author:
  • Post category:Activities

सेवा भारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विविध गट करून यावर्षी सामाजिक रक्षाबंधन साजरे केले. त्याचे अनेकांनी शब्दांकन केले. त्यापैकी काही निवडक अनुभव आणि छायाचित्रे

शहीद शिरीष कुमार गटाने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यासाठी प्रो सुशील डिस्ट्रीब्यूटर येथे भेट दिली. या उत्सवासाठी प्रो सुशील डिस्ट्रीब्यूटर चे चार मालक व 30 ते 35 सेवक वर्ग उपस्थित होता. डॉक्टर शिवयोगी पुराणिक यांनी रक्षाबंधन उत्सवाबद्दल माहिती दिली. आपल्या सेवा भारतीच्या अशा अनोख्या उपक्रमाबद्दल प्रो सुशिल डिस्ट्रीब्यूटर चे सर्व लोक खूपच आनंदी व समाधानी होते. त्यांचे मालक दिलीप जी चांगेड यांनी प्रो सुशील तर्फे सेवा भारतीच्या सर्व सेवक वर्गाचे आभार व्यक्त केले. तसेच वार्षिक 365 रुपये च्या वर्गणी मध्येही प्रो सुशील कंपनीस समाविष्ट करण्याची विनंती केली. शेवटी डॉ. श्रुती दायमा यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम समाप्त झाला.
डॉ शिवयोगी पुराणिक


स्वातंत्र्यवीर राजगुरू गटातर्फे चांदणी चौक PHC येथे रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी आशा वर्कर, PHC मधील सर्व स्टाफ उपस्थित होता. डॉ. दीप्ती लाटा यांनी रक्षाबंधन उत्सवाबद्दल माहिती दिली. आपल्या सेवा भारतीच्या अशा अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व लोक खूपच आनंदी व समाधानी होते. त्या सर्वानी सेवा भारतीच्या सर्व सेवक वर्गाचे आभार व्यक्त केले. सर्वांना मिठाई देऊन तोंड गोड करण्यात आले.शेवटी अजिंक्य गोडसे सरांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम समाप्त झाला.
माधुरी माने (नर्सिंग विभाग)

स्वातंत्र्यवीर सुखदेव गटातील सर्व सदस्यांनी इचलकरंजी ट्रॅफिक ऑफिसमधील ऑन ड्यूटी पोलिसांना राखी बांधुन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रत्येकाच्या सुखांत नव्हे तर दु:खा मध्येच आपल्यासमोर येणारे व्यक्ती म्हणजे स्मशानभुमी मध्ये अहोरात्र सेवा पुरवनारे स्वामी यांना सुद्धा आम्ही राखी बांधली. ज्यावेळी आम्ही स्वामींना राखी बांधली त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
डॉ. वैशाली लोखंडे

लोकमान्य टिळक या गटाने रोटरी क्लब येथे रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमासाठी श्री. संजय खोत, श्री. रवींद्र नाकील तसेच रोटरी क्लबचा सर्व स्टाफ उपस्थित होता. आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा रुग्णालयाचा हेतू सांगितला तसेच रुग्णालयात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगितली.त्यानंतर सर्वांना राखी बांधून मिठाई देण्यात आली. रोटरीचा सर्व स्टाफ व आमच्या गटातल्या सर्वांनी एकमेकांशी ओळख करून घेतली. तिथल्या सगळ्यांना आपला हा उपक्रम फार आवडला. त्यांनी पुढच्या वर्षी त्यांच्या इथे सुद्धा असा उपक्रम करायचे ठरवले आहे. आपल्या रुग्णालयाच्या कामाबद्दल व उपक्रमांबद्दल रुग्णालयाचे व आपल्या सर्व स्टाफ चे कौतुक केले.
धनश्री माने (लॅबोरेटरी विभाग)