सेवा भारती संचलीत डॉ. हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी
कोरोना च्या जागतीक महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे अनेक शासकीय व खाजगी दवाखाने व हॉस्पिटलमध्ये रुग्णांची अनावश्यक गर्दी वाढत आहे. ही गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत होऊ शकते. ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही वैद्यकीय हेल्पलाईन (Medical Helpline) सुरू करीत आहोत. तुम्हास आरोग्यविषयक किंवा मानसिक कोणतीही समस्या असल्यास तुम्ही आमच्या रुग्णालयातील खाली दिलेल्या डॉक्टर व Psychotherapist (समुपदेशक) यांच्या फोन नंबर (दूरध्वनी) वर संपर्क करून तुमच्या शंका दूर करू शकता. तसेच गरजेनुसार विशेष तक्रारींसाठी विनंती केल्यास रुग्णालयातील महिला डॉक्टर्स संवाद साधतील.