सेवाभारती मध्ये बाह्यरुग्ण विभाग शुल्कामध्ये सवलत

सेवाभारती मध्ये बाह्यरुग्ण विभाग शुल्कामध्ये सवलत

सध्या चालू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गरजू गरीब रुग्णासाठी सेवाभारतीने बाह्यरुग्ण विभागासाठी शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शहर व परिसरातील अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. पैशाच्या कमतरतेमुळे अनेक गरीब रुग्णांची उपचारावाचून अडचण होत आहे. ही बाब डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या सेवकवर्गाच्या लक्षात आली. सदर बाब समोर आल्यानंतर सेवा भारती संचालक मंडळाने बाह्यरुग्ण विभागाचे शुल्क ५०% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ मे २०२० पासून दि. ३१ जुलै २०२० पर्यंत ही ५०% सवलत चालू राहील. या कालावधीत सामान्य तपासणी नोदणी २०/- रु. व फेरतपासणी १०/- रु. असे शुक्ल राहील.

सेवाभारतीने असेही आवाहन केले आहे कि ज्यांना ही सवलत घ्यायची आवश्यकता वाटत नाही त्यांनी शुल्काची उर्वरित रक्कम सेवाभारतीच्या दानपेटीत टाकावी. ही माहिती सेवाभारतीचे प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेश पवार यांनी दिली आहे.