दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा भारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालय मध्ये धन्वंतरी पूजन करून दिवाळीची आनंदमय सुरुवात करण्यात आली. धन्वंतरी पूजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दि. 23 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सर्वांचे लाडके कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साले सर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मेडिकल असोसिएशन इचलकरंजी चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शरद मिठारी सर होते. सोबत आपल्या सर्वांचे लाडके जेष्ठ सर्जन डॉ. गोविंद ढवळे सर व आपल्या हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. त्यानंतर धन्वंतरी स्तवन डॉ. देसाई मॅडम, डॉ. संदेश आरेकर, डॉ. पूजा पाटील, डॉ. कोरे व डॉ. दिप्ती लाटा यांनी गायले. यावेळी डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा माहितीपट व्हिडिओ द्वारे दाखवला. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. राजेश पवार सरांनी सांगितली. त्यानंतर डॉ. योगेश साले सर संबोधनासाठी उभे राहिले. सरांच्या भाषेत सांगायचे म्हटले तर संबोधन नव्हतेच, ती होती एक फॅमिली चर्चा… सरांनी त्यांच्या भाषणात डॉक्टरांच्या समाजाप्रति असलेला सेवाभाव व देशभक्ती याबद्दल सांगितले. तसेच उपस्थित सर्व डॉक्टरांना आरोग्य अधिकारी या नात्याने त्यांनी डॉक्टरांसाठी आवश्यक असणारे कायदे व त्यातील तरतुदी संबंधी सुद्धा माहिती दिली. त्यानंतर डॉ. शरद मिठारी सरांचे अध्यक्षीय संबोधन झाले.
पुढे आला तो सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे मेडिकल असोसिएशन इचलकरंजीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार… या कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे डॉ. राजेश पवार सरांनी प्रत्येक डॉक्टरांसाठी सत्कारावेळी वापरलेली एक विशेष विशेषणे… सुमारे 20 ते 22 माईच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमात झाला. शेवटी शांती मंत्र होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर भगत सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली. कार्यक्रम नीट होण्यासाठी आमच्या आयुर्वेद विभागाने कष्ट घेतले. सोबत आमचे आदरणीय एचओडी डॉ. होसिंग सर, डॉ. देसाई मॅडम, डॉ. कोरे सर, डॉ. शिव सर यांचा सहयोग मिळाला.
डॉ. संदेश आरेकर,
मेडिकल ऑफिसर,
डॉ. हेडगेवार रुग्णालय.