सेवा भारती संचलित डॉक्टर हेडगेवार फिरते रुग्णालय

सेवा भारती संचलित डॉक्टर हेडगेवार फिरते रुग्णालय हे ग्रामीण भागातील व शहरी उपेक्षित वस्त्यांच्या आरोग्याचा कणाच बनले आहे. गेली तीस वर्षे फिरते रुग्णालय अविरतपणे काम करत आहे. एकूण 13 ठिकाणी फिरते रुग्णालय आठवड्यातून दोन वेळा भेट देते.

रक्तदाब मधुमेह दमा संधिवात असे वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना अतिशय माफक दरात (रुपये दहा/रुपये पाच) तीन दिवसांचे औषध उपचार केले जातात. रुग्णांची सामान्य तपासणी, रक्तदाब पाहणे, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे, मलमपट्टी, वाफ देणे अशा प्रकारच्या सेवांचा यात समावेश आहे. पुढील उपचारांची गरज असल्यास तसा सल्ला ही रुग्णांना दिला जातो. या व्यतिरिक्त फिरते रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी जाते त्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी शिबिरे वर्षातून एक वेळा मोफत घेतली जातात. वयोवृद्ध रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून वयोवृद्ध रुग्णांच्या आरोग्याविषयी नातेवाईकांना माहिती दिली जाते.

वार सकाळी दुपारी
सोमवार, गुरुवार चंदूर गांव / चंदूरवाडी कृष्णानगर
मंगळवार, शुक्रवार कोरोची/लालनगर/इंगळी आसरानगर, संगमनगर
बुधवार, शनिवार कसनाळ, ढोणेवाडी, रेंदाळ, बिरदेवनगर रेणुका नगर

तसेच स्त्रियांच्याकरिता तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने विशेष स्त्री आरोग्य तपासणी केंद्र देखील एका मार्गावर सुरू केले आहे. आगामी वर्षात फिरत्या याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचा मानस आहे.

यामध्ये प्रामुख्याने

  • शालेय किशोरवयीन मुलामुलींसाठी दोस्ती उपक्रम
  • शालेय विद्यार्थ्यांना आहार-विहार आणि व्यसनाबद्दल जागृती निर्माण करणारा शालेय आरोग्य कोपरा प्रकल्प
  • विविध प्रकारच्या रक्त तपासण्याची सोय उपलब्ध करून देणे
  • आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर उपलब्ध करणे
  • फिरत्या रुग्णालयाच्या सर्व मार्गावर विशेष स्त्री आरोग्य तपासणी केंद्र चालवणे