ढोणेवाडी आरोग्य तपासणी शिबीर

ढोणेवाडी आरोग्य तपासणी शिबीर

  • Post author:
  • Post category:Activities

मेडिकल असोसिअशन ऑफ इचलकरंजी (माई) व डॉ. हेडगेवार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ढोणेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

मेडिकल असोसिअशन ऑफ इचलकरंजी (माई) या वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवाभावी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य माई, सेवा भारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालय तसेच सेवा भारती सेवा संघ, ढोणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ३० सप्टे. रोजी ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील श्री मलकारसिद्ध मंदिरामध्ये श्वसनविकार व हृदयविकार संबंधित (धाप, दमा, खोकला ई.) आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ढोणेवाडी व परिसरातील एकूण ४६ रुग्णांची आरोग्य तपासणी डॉ. श्रीधर जाधव व डॉ. पद्मज बडबडे यांनी केली. तसेच याप्रसंगी माई चे अध्यक्ष डॉ. शरद मिठारी यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते भारत माता पुजनाने झाले. यावेळी माई चे अध्यक्ष डॉ. शरद मिठारी, सेवा भारती चे डॉ. बाळकृष्ण होसिंग, डॉ. शुभम गंदुगडे, नरोत्तम लाटा, प्रशांत शिरापुरम, गिरीश खोंद्रे, वैभव माळी हे उपस्थित राहिले.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी ढोणेवाडी गावातील सेवा भारती सेवासंघ या संस्थेचे कार्यकर्ते रावसाहेब माळी, राजेंद्र बंकापुरे, ओंकार मळगे, गोविंद खडके, संतोष पाटील, स्वप्नील गावडे, ओंकार तेलवेकर, श्रीनाथ घाटगे यांचे सहकार्य लाभले.