बुद्धपोर्णिमे दिवशी शांतीनगर,बिंदगे टेक येथील वस्ती आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न

बुद्धपोर्णिमे दिवशी शांतीनगर,बिंदगे टेक येथील वस्ती आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न

बुद्धपोर्णिमे दिवशी शांतीनगर,बिंदगे टेक येथील वस्ती आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. सेवभारतीचे संचालक श्री प्रकाश गणपुले यांनी बुद्धपुजन करून शबीराची सुरुवात केली.डॉ राजेश पवार यांनी बुद्ध वंदना सांगितली. डॉ यशवंत मोरे यांनी शबीराची माहिती दिली. डॉ पल्लवी पैठणकर, डॉ जयश्री देसाई, डॉ पूजा पाटील व डॉ श्रेया ढवळे यांनी महिला तपासणी केली. यावेळी श्री संदीप जाधव,श्री विजय कदम, श्री प्रशांत शिरापूरमश्री स्वप्नील जाधव, श्री सुनील जाधव . व अन्य तरुणांनी परिश्रम पूर्वक शिबीर यशस्वी केले. शिबिरात १०५ महिलांची तपासणी झाली.