मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (माई) व सेवा भारती संचलित डाॅ. हेडगेवार रूग्णालय, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा
श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गांधी पुतळा येथे विनामूल्य वैद्यकीय सेवा
देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन मनपा आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे, आरोग्य अधिकारी डाॅ. सुनिलदत्त संगेवार, माई चे अध्यक्ष डाॅ शरद मिठारी, सेवा भारतीचे अध्यक्ष श्री भगतराम छाबडा यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी डाॅ. हेडगेवार रुग्णालयाचे डाॅ राजेश पवार, डाॅ. यशवंत मोरे, डाॅ. बाळकृष्ण होसिंग, डाॅ. शुभम गंदुगडे, नरोत्तम लाटा, माई चे सेक्रेटरी डाॅ. राजेश कुंभार, मनपा अधिकारी श्री विजय राजापुरे, श्री सुनिल बेलेकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.