आज थोर आयुर्वेदाचार्यांना भेटण्याचा योग आला. आज सकाळी ऑन ड्युटी असताना डॉक्टर राजेश पवार सरांचा निरोप आला सर्वांनी खाली माझ्या केबिनमध्ये या , एका डॉक्टरांची भेट घालून द्यायची आहे. मग आम्ही सगळे सरांच्या केबिनमध्ये पोहोचलो. तिथे बसलो असता एक वयस्कर व्यक्ती केबिनमध्ये प्रवेश करत होती. ही व्यक्ती दिसायला एकदम साधी, वेशभूषा ही साध्या पद्धतीची आणि डाव्या खांद्यावर एक कापडी झोळी अडकवलेली अशा या व्यक्तींनी जेव्हा केबिनमध्ये प्रवेश केला तेव्हा सरांनी आम्हाला त्यांची ओळख करून दिली. सुरुवातीला असं वाटलं की हेही जनरल डॉक्टर आहेत आणि एका दुर्गम भागात प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे त्यांचं काम थोडं मोठं असावं. पण जसजशा गप्पा रंगत गेल्या त्यांची ओळख सरांनी करून दिली त्यांच्या कामाचा व्याप किती आहे, त्यांच्या कामाचं स्वरूप कसा आहे ते किती काम करतात, कोणत्या पद्धतीने काम करतात हे जेव्हा चर्चेतून आमच्या लक्षात आलं तेव्हा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.ही साधी सिंपल दिसणारी व्यक्ती एवढा मोठा काम करते एवढी समाजसेवा करते आयुर्वेदाला एवढा महत्त्व देऊन आयुर्वेदाचा प्रचार करते अशीही व्यक्ती आपल्यात बसली आहे आणि या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही, कसलच घमंड नाही अशीही महान व्यक्ती आमच्यामध्ये आमच्यातलीच एक होऊन बसली आहे खरंतर हे आपलं भाग्यच म्हणावं.
प्रथमदर्शनी असं वाटलं की, असेल कुणीतरी पण जेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव सांगण्यास सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की आपण अशा एका महान वैद्यांच्या सोबत बसलो आहोत की जे आयुर्वेदा आणि आपल्या परंपरा, संस्कृतीशी एकरूप आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या पारंपारिक आयुर्वेदिक उपचार पद्धती जपून ठेवल्या आहेत.
त्यांनी आम्हाला त्यांच्या अनुभवातून आयुर्वेदाचे महत्त्व इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. मी ही एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण त्यांना भेटल्यानंतर मला आता खरंच असं वाटू लागलं आहे की आपणही उपचारासाठी संपूर्णपणे आयुर्वेदाचा अवलंब करावा.
वैद्य देसाई जेव्हा त्यांचे अनुभव कथन करत होते तेव्हा त्यांच्या कथनातून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या होत्या. त्यांना आलेले अनुभव त्यांचे प्रयोग त्यांचे रिसर्च याबद्दल त्यांनी भरभरून सांगितलं आणि हे सगळं ऐकून मन अगदी भारावून गेलं आणि खरंच आपणही असं काही करू शकतो किंबहुना करावं असं मनाने निश्चय केला. त्यांनी त्यांच्या कथनात एवढी सुंदर सुंदर अनुभव सांगितले की आयुर्वेद शास्त्रावरचा आज विश्वास अजून दृढ बनला.
पंचमहाभूतांचा वर्णन करताना त्यांनी एवढे सुंदर उदाहरण दिलं आपली करंगळी ही पंचमहाभूतांपैकी एक महाभुत दर्शविते ती म्हणजे जलमहाभूत त्याचे उदाहरण देत असताना त्यांनी आम्हाला एक प्रश्न केला शाळेमध्ये असताना मूत्रविसर्जनासाठी जाताना आपण करंगळी का दाखवतो तर याचे उत्तर आमच्यात कोणाकडेच नव्हतं तेव्हा त्यांनी आम्हाला पटवून दिलं की करंगळी ही जलमहाभूत दर्शविते म्हणून आपण ते खूनवण्यासाठी करंगळी चा वापर करतो आतापर्यंत आपण हे आंधळेपणाने फॉलो करत होतो पण यामागेही एक शास्त्रीय कारण आहे हे आता लक्षात आलं , तसेच नाक व कान टोचण्यामागचं कारण काय, नामकरण संस्कार का करतात, याचंही एक शास्त्रीय कारण आहे याबद्दल आपल्या कोणालाच काहीच ठावठिकाण नाही. याच गोष्टी आपण विसरत चाललो आहोत, हळूहळू आपल्या परंपरा आपल्या चालीरीती या सगळ्यांपासून दूरावत चाललो आहोत आणि आपल्याला पुन्हा त्या जुन्या चालीरीती परंपरा यांना आपलंसं करायचं आहे.
वैद्य देसाई त्यांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धती सांगताना आणखी एक उदाहरण सांगितलं ते म्हणजे आता सध्या नवीन आलेला महामारी रोग म्हणजेच कोरोना या कोरोनाच्या काळात त्यांनी जवळपास 40 हजार एवढ्या मोठ्या लोकसंख्येला स्वतः अभ्यासाने बनवलेला आयुर्वेदिक काढा दिला तो काढा घेणाऱ्यांपैकी एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली नाही. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारच्या तपासण्या न करता एखादा पेशंट कोणत्या आजाराने ग्रस्त आहे हे कसं ओळखावं त्याचे टिप्स दिले. तसेच जर आपल्याला एक चांगलं वैद्य किंवा एक चांगला डॉक्टर बनायचं असेल तर कोणत्याही प्रकारच्या तपासण्यांवर अवलंबून न राहता जसं की ब्लड इन्वेस्टीगेशन एक्स-रे सोनोग्राफी एमआरआय इ. या तपासण्या न करता ही आपण पेशंटच्या डायग्नोसिस पर्यंत पोहोचू शकतो व त्याच्यावर उपचार करू शकतो याची अनेक उदाहरणं त्यांनी आम्हाला सांगितली. तसेच त्यांनी त्यांच्या रिसर्च बद्दल ही आम्हाला सांगितलं जसं की वंध्यत्व ,कॅन्सर यासारखे आजार असो किंवा नक्षत्र अभ्यास, सूर्यावर असणाऱ्या डागांचा अभ्यास असो किंवा भूकंपाचा अभ्यास याबद्दलही त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली.
अशा या महान व्यक्तीला सॉरी वैद्यांना भेटण्याचा योग आला खरंच आमचं भाग्य आहे आणि खरंच जर कोणाला आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अनुभव घ्यायचा असेल तर वैद्य देसाई यांची नक्कीच एकदा भेट घ्या.
डॉ पूजा पाटील,
मेडिकल ऑफिसर,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.