आज दिनांक 14 फेब्रुवारी आजचा दिवस जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करतात मात्र हा दिवस आपण वेगळ्या पद्धतीने देखील साजरा करू शकतो. ही भावना मुलांमध्ये रुजावी या दृष्टिकोनातूनच आपण मातृ-पितृ दिन साजरा करण्याचे ठरवले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय सौ .नलिनी मेढे तसेच माननीय श्री. जयकुमार पाटील व सौ रेखा पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रथम माता व पिता यांचे पाद्यपूजन करून औक्षण केले तसेच त्यांना भेटवस्तू दिल्या. आई वडीला विषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली. पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून माधव विद्यामंदिर ही संस्कारक्षम शाळा आहे हे वक्तव्य व्यक्त केले .तसेच मातृभाषेतून शिक्षण घेणे याचे महत्त्व पटवून दिले
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक माननीय श्री किरण बन्ने सर हे देखील उपस्थित होते. अशाप्रकारे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाऊ शकतो हा नवीन आदर्श कार्यक्रमांद्वारे सर्वांसमोर ठेवण्यात आला .या कार्यक्रमासाठी 80 टक्के पालकांची उपस्थिती होती. अशा पद्धतीने मातृ-पितृ दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.