सेवा भारती संचलित डाॅ. हेडगेवार रूग्णालयाच्या आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा विभागांतर्गत, पोटांचे विकार व अग्निमांद्य या विकारांनी पिडीत व गरजू अशा रूग्णांकरिता तपासणी व पंचकर्म शिबिरास रविवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सोना पार्वती सदन येथे प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन सेवा भारती चे कार्यकर्ते श्री शिवप्रसादजी तोतला यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन करून झाले. सदर शिबिरामध्ये तज्ञ वैद्यांद्वारे आयुर्वेद व पंचकर्माच्या आधारे तपासणी व उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वैद्य सूर्यकिरण वाघ, वैद्य ज्ञानेश्वर भगत, वैद्य दीप्ती लाटा, वैद्य जयश्री देसाई यांनी तपासणी करून उपचाराबाबत योग्य मार्गदर्शन केले.
या शिबिरास मागील शिबिराप्रमाणे अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला व आयुर्वेद व पंचकर्म उपचार शिबिर दि. 16 सप्टेंबर पर्यंत असेल या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आव्हान डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार व आयुर्वेद विभागाचे प्रमुख वैद्य ज्ञानेश्वर भगत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.