सेवाकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या ईचलकरंजीच्या सेवाभारती संस्थेने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ईचलकरंजीच्या इंदिरा सामान्य रुग्णालयास ५० बेड चा वॉर्ड उभा करून दिला आहे. कोरोना विरुद्धच्या एकत्रीत लढ्यात प्रशासना सोबत ताकतीने उभे राहून सेवाभारतीने सेवाकार्याचा नवा मापदंड उभा केला आहे.कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ परिसरासाठी सुमारे १००० रुग्णांची सुविधा निर्माण करण्याचे काम प्रशासन युद्ध पातळीवर करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुमारे ४०० खाटांची क्षमता असलेली कोरोना समर्पित व्यवस्था उभारणे चालू आहे. यासाठी लागणाऱ्या कॉट्स पुरवण्याची विनंती प्रांत अधिकारी डॉ विकास खरात यांनी जिल्हा प्रशासना मार्फत सेवाभारतीकडे केली.
या विनंतीस प्रतिसाद देत सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे पन्नास बेड IGG रुग्णालयास देण्याची तयारी सेवाभारती संचालक मंडळाने दाखवली. तातडीने बेड निर्मितीची व्यवस्था केली. हे 50 बेड,गाद्या व उशी इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ शेटे यांच्या स्वाधीन केले. याबद्दल जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ केम्पेपाटील व प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सेवाभारतीचे अध्यक्ष भगतरामजी छाबडा व अन्य संचालक उपस्थित होते.