आपल्या सर्वांच्या सदिच्छा व सहकार्याने कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालय या वैद्यकीय सेवेस २ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर शहरातील १२ विविध सेवा वस्त्यांमध्ये आणि गगनबावडा परिसरातील अतिशय दुर्गम गावांमध्ये आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून नियमित वैद्यकीय सेवा सुरू आहे. या सेवा प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त हितचिंतक, देणगीदार व सेवा वस्तीतील संपर्कीत कार्यकर्ते या सर्वांचेस्नेह मिलन आयोजित केले आहे.सभारंभ दिनांक ववेळ : सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ५ वाजता.स्थळ : स्व. पांडुरंग दा. माने सांस्कृतिक भवन, दत्त मंदिर जवळ, फुलेवाडी, कोल्हापूर.
