जनऔषधि केंद्राचे शुभारंभ करताना भगतराम छाबडा व इतर मान्यवर.
आपल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या चंदूर येथील वस्ती आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचा शुभारंभ..
चंदूर येथे सेवा भारतीच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचा शुभारंभ डॉ. प्रवीण दबडघाव (प्रांत कार्यवाह, रा. स्व. संघ) यांच्या शुभहस्ते झाला. या प्रसंगी बोलताना डॉ. प्रवीण दबडघाव यांनी सेवा भारतीच्या जेनेरीक औषधी केंद्राच्या या प्रकल्पाचे कौतुक केले. अनेक गरीब रूग्णांच्या औषध खरेदीत येणारी अडचण दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेवा भारतीच्या आजवरच्या समाजोपयोगी उपक्रमांचा उल्लेख करीत आरोग्याच्या अन्य समस्यांना हात घालायचे आवाहन त्यांनी संस्थेला केले. डॉ. हेडगेवार रूग्णालयाच्या होणाऱ्या रुग्ण सेवेबाबत व तेथील उपचार व सुविधांच्या दर्जाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
सेवा भारतीचे कार्यवाह प्रमोद मिराशी यांनी जेनेरीक औषधांसंबंधी व केंद्र सरकारच्या जनऔषधी योजने संदर्भात माहिती दिली. सेवा भारतीचे अध्यक्ष भगतराम छाबडा यांनी स्वागत केले. प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार यांनी प्रास्ताविकात सेवा भारतीच्या कामाचा आढावा घेतला. या प्रसंगी परिसरातील नागरिक, सेवा भारतीचे कार्यकर्ते, भागातील लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गोविंदजी सोनी यांनी आभार मानले. लक्ष्मण मलकापूरे, अतुल आंबी, दिगंबर चिल्लाळ, डॉ बाळकृष्ण होसिंग आदिंनी परिश्रम घेतले.
![](https://sevabharati.org/wp-content/uploads/2024/12/1000327849-761x1024.jpg)